सातारा : अवैधरित्या मांस विक्री केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठ, सातारा येथे तेथीलच इकबाल आदम शेख आणि आदम हनीफ शेख हे दोघे त्यांच्याकडे जनावरे कापण्याचा व मांस विक्रीचा परवाना नसतानाही सुमारे 22 किलो वजनाचे लालसर, पांढरट, मोठी हाडे असलेले मांस विक्री करण्यास बसलेले आढळून आले. याबाबत या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.