निरोगी आरोग्यसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. संपूर्ण जगभरात 22 मार्चला जागतिक जल दिवस साजरा केला जातो. या दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर जागरूकता निर्माण केली जाते. तसेच पृथ्वीवर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक घामावाटे आणि लघवीवाटे बाहेर पडून जातात. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. शरीरात प्रत्येक पेशींना पाण्याची आवश्यकता असते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
नियमित पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे:
पेशींच्या बांधणीसाठी गुणकारी:
शरीरात लाखोंच्या संख्येने पेशी आढळून येतात. या प्रत्येक पेशीला निरोगी आणि जिवंत ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला हानी पोहचते. केस, त्वचा, नखे यांच्यातील पेशींची बांधणी टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात कोलेजनची निर्मिती होते आणि वय वाढल्याच्या खुणा दिसून येत नाही. सांध्यांमधील घर्षण होऊ नये म्हणून पाण्याचे भरपूर सेवन करावे.
शरीराचे तापमान नियंत्रणात राहते:
शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. नियमित ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक शारीरिक क्रिया बंद पडू शकतात. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे.
डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही:
उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. अशावेळी नियमित भरपूर पाणी, नारळाचे पाणी किंवा इतर सरबताचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. डिहायड्रेशन झाल्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते, ज्यामुळे ऊर्जेची पातळी कमी होऊ लागते. डिहायड्रेशन झाल्यामुळे अतिसार, पाणी कमी पिणे, पोटाचा फ्लू, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
पचनक्रिया सुधारते:
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते, पोटासंबंधित समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पाण्यामध्ये असलेले इलेक्ट्रोलायटस, म्युकस आणि एन्झाइम्स अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे.