मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 05 February 2026


सातारा :   सातारा जिल्ह्यातील  जिल्हा परिषद व 11 नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यासाठी  7 फेब्रुवारी रोजी मतदान व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तरी सदर निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पडावी व त्यावर आठवडा बाजाराचा परिणाम होवू नये, याकरीता मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहे. 

तरी या आदेशानुसार मतदान केंद्राजवळीच आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबाजारात कोयना सोसायटीजवळ उभ्या ट्रकला भीषण आग; लाखोंचे नुकसान
पुढील बातमी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी

संबंधित बातम्या