सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री आठ वाजण्याच्या पूर्वी मनोज भक्तवत्सल तिवारी रा. शनिवार पेठ, सातारा यांनी घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.