सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या वाघाची भर; ‘रायबा’चे आगमन; ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट छायाचित्र

by Team Satara Today | published on : 01 April 2026


कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या वाघाची भर पडली असून, या नर वाघाला ‘रायबा’ असे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात काही महिन्यांपासून वावरणाऱ्या या वाघाचे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तीन ते चार वर्षे वयाचा हा सुदृढ वाघ यापूर्वी वनविभागाच्या रेकॉर्डवर नव्हता. मात्र ‘ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन’मध्ये त्याची उपस्थिती सूचित झाली होती. डिसेंबर २०२५ मध्ये प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचे स्पष्ट छायाचित्र टिपण्यात आले. या वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेची तुलना सिंधुदुर्गमधील तसेच कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी करण्यात आली; मात्र कोणताही मेळ न बसल्याने हा वाघ नवा असल्याचे सिद्ध झाले.

राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे व्यवस्थापन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे येत असल्याने क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी त्याला 'एसटीआर टी ०७' हा सांकेतिक क्रमांक दिला असून स्थानिकांनी प्रेमाने ‘रायबा’ असे त्याचे नामकरण केले आहे.  'राधानगरी'चे महत्त्व अधोरेखित ३५१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेले राधानगरी अभयारण्य सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा आहे. हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दक्षिणेकडून म्हणजेच तिलारी आणि आंबोली मार्गे स्थलांतर करून येणारे वाघ हे राधानगरी अभयारण्यात काही काळ मुक्काम करतात. येथे स्थिरावल्यानंतर ते  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने येतात. 'सुभेदार'ही होता वर्षभर राधानगरीत यापूर्वीचा 'सुभेदार' हा वाघही राधानगरीत अभयारण्यातच वर्षभर वास्तव्य करून होता. याच ठिकाणी त्याची सर्वप्रथम वन विभागाच्या कॅमेऱ्यात नोंद झालेली होती. सध्या तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थिरावलेला आहे.  


असा आहे 'रायबा'चा प्रवास -  नोव्हेंबर २०२५-पाऊलखुणा आढळल्या,  ८ डिसेंबर २०२५-नव्या वाघाची विष्ठा आढळली, ▪ १३ डिसेंबर २०२५-कॅमेरा ट्रॅप मध्ये छायाचित्र टिपण्यात यश  


सह्याद्रीत वाघांची संख्या आठवर रायबाच्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता ८ झाली आहे. एसटीआर टी ०१ सेनापती  एसटीआर टी ०२ सुभेदार  एसटीआर टी ०३ बाजी एसटीआर टी ०४ चंदा एसटीआर टी ०५ तारा एसटीआर टी ०६ हिरकणी एसटीआर टी ०७ रायबा एसटीआर टी ०८शिलेदार सह्याद्रीत वाढती वाघसंख्या हे व्याघ्र संवर्धनाच्या यशाचे द्योतक आहे.राधानगरी अभयारण्य सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा आहे.

     -तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी
पुढील बातमी
मारुल तर्फे पाटण येथे वणव्याने आंबा, नारळ, सुपारी, बाग उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी