नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती, शेतकरी आणि नागरिकांसमोरील अडचणी तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शाह यांनी दिल्याची माहिती आहे.