सातारा : वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राधिका रोडवरील शेतकरी भाजी मंडई येथे दोन अज्ञातांनी नारायण सावळा सावंत (वय 80, रा. तामजाई नगर, सातारा) यांच्याकडून पन्नास रुपये घेऊन त्यात सावंत यांची अंगठी गुंडाळून यानंतर रुमाल घेऊन त्यात अंगठी व पन्नास रुपये गुंडाळून ठेवून हातचलाखीने नारायण सावंत यांची साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली आहे. याप्रकरणी संबंधित दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.
साताऱ्यात भाजी मंडईत वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा