कराड-ढेबेवाडी मार्गावर कुसूर गावच्या हद्दीत दुचाकी दुभाजकाला धडकून युवक ठार

by Team Satara Today | published on : 15 November 2026


कराड : कराड-ढेबेवाडी मार्गावर कुसूर गावच्या हद्दीत भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
कमलेशकुमार सिबार कोल (वय २५, मूळ रा. उपरवली, ता. सिधी, जि. सिलावर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कमलेशकुमार हा शनिवारी सकाळी दुचाकीवरून कराड-ढेबेवाडी मार्गावरून तळमावलेहून कोळेच्या दिशेने कामासाठी निघाला होता. सकाळी ८.२० च्या सुमारास कुसूर गावच्या हद्दीत दुचाकी दुभाजकास धडक दिली.
यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम; १२ दिवसांचे ‘उभे नवरात्र’ सुरु, भाविकांकडून कठोर नियमांचे पालन करुन श्रींची अखंड उपासना
पुढील बातमी
पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन ग्रामपंचायत, रस्ते व स्मशानभूमीची कामे लागणार मार्गी; ६ कोटी ३४ रुपयांचा निधी मंजूर

संबंधित बातम्या