01:49pm | Jan 14, 2025 |
सातारा : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण या कार्यालयाच्या अभिलेखावर नोंद असलेल्या वाहनांकरिता Zone No.2 मध्ये M/s Real Mazon India Ltd. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांच्या सोयीकरिता सदर कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.
वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या https:/transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील. तसेच वाहनधारकांना आपल्या नजीकच्या कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटरवर अपॉईमेंट घेऊन सदरची सुविधा घेता येईल. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता वाहन प्रकार निहाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट शुल्क जीएसटीसह - टु व्हिर्लस व ट्रॅक्टर्ससाठी - रु. 531/-, थ्री व्हिर्लससाठी - रु. 590/-, लाईट मोटार व्हेईक्ल्स/पॅसेंजर कार/मेडियम कर्मशिअल व्हेईक्ल्स/हेवी कर्मशिअल व्हेईक्ल्स आणि ट्रेलर/कॉम्बिनेशनसाठी - रु. 879.10/-
वरीलप्रमाणे शुल्क आकारण्यात यईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.
सातारा आणि फलटण कार्यालयातील जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट कंपनी फिटमेंट सेंटर पुढीलप्रमाणे. कोरेगाव - सातारा पंढरपूर रोड, वसुधा पेट्रोलपंपाशेजारी. सातारा-हेम कंपनी, फ्लुरा हॉटेलजवळ, वडूज- वरद ॲटोमोबाईलजवळ कराड रोड, खंडाळा- शिवाजी चौक मार्केट यार्ड गाळा खंडाळा लोणंद रोड, वाई - वाई बावधन रोड अर्थव आदित्य फटाका जवळ, फलटण- शिंगणापूर रोड समर्थ ऑफसेट अजित नगर कोळकी, दहिवडी- मायणी रोड बीएसएनल ऑफीसच्या समोर, महाबळेश्वर- नॅशनल गॅरेज टॅक्सी स्टँड दत्त मंदिर जवळ (संपर्क क्र. 8275370068)
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह खासगी ठेकेदार लाचलुचपतच्या जाळ्यात |
महादरेच्या डोंगरात तरुणाची आत्महत्या |
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा एसआयटीने घेतला ताबा |
दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद |
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व |
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा |
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी |
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक |
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक |
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान |
राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा |
आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय |
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |

निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास |
सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही |
अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील |
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद |