सातारा : नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये प्रतापगडापासून ते पाटणपर्यंतचा मोठा परिसर आहे. या प्रकल्पामध्ये 235 गावे अंतर्भुत आहेत. आणखी 295 गावांनी या प्रकल्पात समाविष्ट करुन घेण्यासाठी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सातार्याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी जी कामं करायची आहेत, ती भूमिपुत्र म्हणून मी करणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी ना. एकनाथ शिंदे यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह नवीन महाबळेश्वर प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.ना. शिंदे म्हणाले, या भागाचा कायापालट करणं हाच माझा उद्देश आहे. पर्यटनाला वाव असणारी ठिकाणे विकसित करणार आहे. याबाबत पर्यटनमंत्र्यांना पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. काही ठिकाणी मुख्यमंत्री, मी स्वत: पाहणी करायला जाईन. या भागाचा विकास, कायापालट करणे, आणि अमूलाग्र बदल घडवणे तसेच इतिहास, संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे.
दरम्यान, यावेळी एमआरडीसीच्या अधिकार्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवीन महाबळेश्वर प्रकल्प कसा होणार आहे? नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये शासनाच्यावतीने काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत? याबाबत प्रेझेंटेशन दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थित अधिकार्यांना काही सूचना केल्या तर ज्या काही अडचणी होत्या, त्यादेखील अधिकार्यांनी शिंदे यांना सांगितल्या.
प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा प्रकल्प होणार असून या ठिकाणी विविध ठिकाणेही विकसित केली जाणार आहेत, तसेच या संपूर्ण परिसरामध्ये नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे, याकडे या भागाचा भूमिपुत्र म्हणून माझे विशेष लक्ष असणार आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी वारंवार गावी येणार आहे, म्हणजे मी नाराज आहे, असे म्हणता येणार नाही, असेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.
शहराकडे स्थलांतरित होणारा तरुण वर्ग या निमित्ताने गावातच राहून उदरनिर्वाह करणार आहे. त्यामुळे नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये नक्कीच स्थानिकांचा फायदा होणार आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, असे एमआरडीसीच्या अधिकार्यांनी ना. एकनाथ शिंदे यांना सांगितले.
कुणाचं काही लाटलेलं नाही किंवा कुठं चोर्यामार्या केलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला पोलिस प्रोटेक्शनची गरज नाही. जिल्हा प्रशासनाने प्रोटोकॉल म्हणून सुरक्षेसाठी दोन गाड्या दिल्या होत्या. मात्र, त्या दोन्हीही गाड्या मी परत पाठवून दिल्या. त्यावेळी पूर्वीच्या जिल्हाधिकार्यांचा मला फोन आला. साहेब एक गाडीतरी ताफ्यात ठेवा. तुम्ही कामासाठी दौरे करताना लोकं येणार. अडचणी येऊ शकतात, अशी विनंतीही पूर्वीच्या जिल्हाधिकार्यांनी केली होती. जिल्हाधिकार्यांना मी सांगितलं की, सुरक्षेसाठी गाडी घेतो पण ती गाडी पुढे जाता कामा नये. ती गाडी मागेच ठेवायची. ती गाडी पुढे गेली आणि सायरन सुरू झाला तर गावातील लोक मला शिव्या देतील. कालपर्यंत बाबा एकटे फिरायचे आज मात्र भोंगा वाजवत फिरतात असं लोक म्हणतील. माझ्यासोबत असताना सातार्यासह कुठेही असताना अजिबात गाडीचा सायरन वाजवायचा नाही, अशी सक्त सूचना पोलिसांना दिली. लोकांना त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही, असे बजावले आहे. मला माहित आहे, आपण सिग्नलवर किंवा वाहतूक कोंडीमध्ये असतो अशावेळी भोंगा वाजत आल्यावर आपल्यालाच वैताग येतो मग दुसर्यांना कसं वाटत असेल? आपल्यावरूनच दुसर्यांचाही विचार करायला हवा. आमदाराचा मंत्री झालो म्हणून मी काहीही करू शकतो, असे नाही. मी मंत्री झालो आणि त्यानंतर आता लातूरचा पालकमंत्री झालो तरी मी सातारकर आहे हे लक्षात ठेवा, असेही ना. शिवेंद्रराजे म्हणाले. यावेळी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, व्यंकटराव मोरे, शशिकांत पारेख, धनश्री महाडिक, बाळासाहेब महामूलकर, रूपाली पवार, नीळकंठ पाटील, रवी पवार, पूनम निकम, पोपटराव मोरे, मालती साळुंखे, सुनील मोरे, राजू मोरे, नगर विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.