सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड तसेच भाऊसाहेब फुंकुंडकर फळबाग लागवड योजनेचे जिल्ह्यात समाधानकारक काम सुरू असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी 15 ग्रामस्तरीय मृद आरोग परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी 27 अर्ज प्राप्त झाले होते. यामधून योजनेच्या निकषाप्रमाणे 15 ग्रामस्तरीय मृद आरोग्य परीक्षण प्रयोगशाळांची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्थाचे अधिकारी प्रकल्प संचालक (आत्मा), विविध विषय समितीचे सदस्य, कृषि विकास अधिकारी, कृषि संशोधन क्रेंद्राचे प्रमुख, कृषिच्या उपविभागांचे उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, प्रगतशील शेतकरी श्री शंकरराव खोत हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके, राष्ट्रीय खादयतेल अभियान तेलबिया, राष्ट्रीय कृषि विकास योजनांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना, आदर्शगांव योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रकीया योजना, एनडीएमएफ प्रकल्प, फळबाग लागवड, कृषि समृध्दी योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत मुल्य साखळी भागीदार यांच्या निवडीस मान्यता देण्यात आली. तसेच गोदाम व काढणी पश्चात सुविधा केंद्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जदारांची निवड सभेमध्ये करण्यात आली. तसेच सन 2024-25 मधील विविध योजनांतर्गत खर्चास मान्यता देण्यात आली.
बैठकीमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी बैठकीत एकूण 13 विषयांचे सादरीकरण सादर केले. विविध योजनांतर्गत सन 2024-25 मधील खर्च, योजना निहाय राबविलेल्या कार्यक्रमाची माहिती सादर केली. अन्नधान्य व तेलबिया यांची उत्पादकता वाढीसाठी पिक प्रात्याक्षिके, प्रमाणीत बियाणे वितरण, किड/रोग व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा व इतर घटकांच्या अंमलबजावणी बाबत सविस्तर आढावा सादर केला.