सातारा : सातारा येथील मंगळवार पेठ होलार गल्ली परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका पुरुषावर लाकडी बॅटने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर इस्माईल शेख (वय ४५, रा. होलार गल्ली) हे समाज मंदिरासमोरून जात असताना मामाश्री (पूर्ण नाव माहिती नाही, रा. धस कॉलनी) आणि श्रवण पवार (रा. मंगळवार पेठ) यांनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी शिवीगाळ करत शेख यांच्यावर लाकडी बॅटने मारहाण केली.
या घटनेनंतर शब्बीर शेख यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक करपे करत आहेत.