अस्तित्व लपवल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन घटनांमध्ये तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावर असणाऱ्या सर्व्हिस रोड लगत मलबार हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला आकाश आप्पासो बनसोडे रा. वर्ये, ता. सातारा हा अंधारात संशयितरित्या आपले अस्तित्व लपवून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बसलेला आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावर असणाऱ्या विठ्ठल मंगलम कार्यालयाच्या आडोशाला अमित मल्लिकार्जुन देशमुख आणि मयूर पांडुरंग शेलार दोघेही रा. म्हसवे, पोस्ट वर्ये, ता. सातारा हे अंधारात संशयितरित्या आपले अस्तित्व लपवून बसलेले आढळून आले. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.



मागील बातमी
पतीस मारहाण केल्याप्रकरणी पत्नी विरोधात गुन्हा
पुढील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या