डॉ. प्रा. प्रतिभा रसाळ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान; यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : जेएसपीएमच्या नऱ्हे  टेक्निकल कॅम्पस, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. (प्रा.) प्रतिभा अमृत रसाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली.

‘महाराष्ट्रातील तृतीयपंथीय समुदायासाठी रोजगाराच्या संधींच्या दृष्टीने कौशल्यविकासाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. यासाठी त्यांना डॉ. आनंद दडस व डॉ. विकास सुरेश डोळे यांचे मार्गदर्शन लाभले. बोरखळ (ता. सातारा) येथील डॉ. रसाळ यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावरील खड्डे आणि भरमसाठ टोल विरोधात साताऱ्यात १३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआंदोलन
पुढील बातमी
म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम; दोषींवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा

संबंधित बातम्या