सातारा : फडतरवाडी पो. जिहे, ता. सातारा येथे झालेल्या मारामारी प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फडतरवाडी पो. जिहे, ता. सातारा येथे दोघांनी एकास वृध्दास मारहाण केली. हा प्रकार दि. 18 रोजी घडला. या प्रकरणी शंकर पांडुरंग जाधव (वय 68, रा. फडतरवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आशा भिकाजी कदम, भिकाजी हणमंत कदम (दोघेही रा. फडतरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
तसेच, शंकर पांडुरंग जाधव यांनी आशा भिकाजी कदम यांच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर त्यांना खाली पाडून मारहाण केली. तसेच भांडणे सोडवण्यास आलेल्या भिकाजी कदम यांनाही मारहाण व शिवीगाळ केली. शंकर जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.