सातारा : पांडवगड, ता. वाई येथे फिरायला आलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांना वाईच्या शिवसह्याद्री बचाव पथकाच्या युवकांनी जंगलातून मोठ्या कसरतीने आणून वाई व सातारा येथे उपचारासाठी दाखल केले. प्राचीन अशा वाईच्या पांडव गडाला अनेक पर्यटक इतिहास प्रेमी भेट देत असतात. या ठिकाणी इंदापूर येथील युवक आल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाल अवती, अमोल दंडवते, चैतन्य देवळे, संतोष जापे हे फिरण्यासाठी आले होत. त्यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळताज वाईच्या शिवसह्याद्री बचाव पथकाने राजेंद्र खरात व प्रशांत डोंगरे यांनी वाई पोलीस स्टेशनचे नितीन कदम व श्रीनिवास बिराजदार, आशुतोष शिंदे, रोहित मुंगसे, सौरभ जाधव, गुंडेवाडी, धावडी पंचक्रोशीतील युवक, महसूल विभाग, आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करून बचाव कार्य पार पाडले. गरवारे टेक्निकल फायबर यांनी तत्परतेने अँब्युलन्स पाठवली. पोलीस अधिकारी आरोग्य प्रशासकीय विभागाच्या मदतीने जखमींना वाई व सातारा आरोग्य विभागात उपचारासाठी दाखल केले.
मधमाशांच्या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर
by Team Satara Today | published on : 10 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अंगापूर गावच्या हद्दीत कृष्णा नदीत सासुर्वे येथील महिलेचा बुडून मृत्यू
December 28, 2025
कोडोलीत अमरलक्ष्मी परिसरात दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी
December 28, 2025
घरासमोर गाडी पार्क केल्याच्या रागातून वनवासवाडी येथे गाडीची तोडफोड
December 27, 2025