सातारा : सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास नागेश राजेंद्र कोरडे रा. गेंडामाळ, सातारा हे राहत्या घरातून बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 13 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोती चौक सातारा येथून अभिजीत बापूराव यादव रा. अमरलक्ष्मी चौक, नवीन एमआयडीसी, सातारा हे बेपत्ता झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.