सातारा : माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आरोग्य, रक्तदान, नेत्र तपासणी, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, रुग्णांना मदत व्याख्यानमाला, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. या सप्ताहात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी भवनात खासदार नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुनील माने, सीमा जाधव, पृथ्वीराज गोडसे, मनोज पोळ, श्रीनिवास शिंदे, प्रदिप विधाते, प्रमोद शिंदे, राजेंद्र लवगारे, मनोज देशमुख, स्मिता देशमुख, राजेश वाठारकर, विक्रमबाबा पाटणकर, शिवाजीराव महाडिक, संदीप मांडवे, कांतीलाल पाटील, शहाजी क्षीरसागर, दत्तानाना ढमाळ, सुरेंद्र गुदगे, संदीप चव्हाण, अरविंद कदम, विक्रांत डोंगरे, बबनराव साबळे, अशोकराव जाधव, संतोष ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नितीन पाटील म्हणाले, मतदार पुननिरिक्षण कार्यक्रमावर नेमणूक झालेल्या सर्व बीएलओंनी लक्ष देऊन सर्व मतदारांचे फॉर्म भरुन घ्यावेत. कोणतीही मतदानापासून वंचित राहू नये, याकडे लक्ष द्यावे. तसेच माजी मुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त सर्व पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सभापती,विविध संस्थांचे अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच कार्यकर्ते यांनी आपल्या विभागात समाज उपयोगी विविध उपक्रम राबवावेत.
बाळासाहेब सोळसकर यांनीही एसआयआर बाबत माहिती दिली. तसेच अजित पवार जयंती निमित्त होणार्या जनसेवा सप्ताहात सर्वांनी सहभागी होत सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. श्रीनिवास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र लवंगारे यांनी आभार मानले.