सातारा : जिल्ह्यातील युवक युवतींचे कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सातारा यांच्यामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत वर्ष १५ ते ४५ वयोगटातील इयत्ता ५ वी पास ते आयटीआय, पदवीधारक, पदविकाधारक उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अॅग्रीकल्चर, हॉस्पिटॅलीटी अँड टूरिझम, अॅटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, कॅपिटल गुडस, आयटी-आयटीइएस, मिडिया अँड एंटरटेनमेंट, पॉवर, डोमेस्टिक वर्कर, ब्युटी अँड वेलनेस, बीएफएसआय, कॅस्ट्रक्शन अशा विविध क्षेत्रांशी निगडित जॉबरोलचे प्रशिक्षण उमेदवारांच्या पसंतीनुसार जिल्हयातील विविध स्कील इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडे नोंदणीकृत पात्र खाजगी प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार आहे.
हे मोफत प्रशिक्षण असून लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/fZVGypLMxvknrTzUA या लिंकवर माहिती भरावी. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, एस.टी.स्टँडजवळ, सातारा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.