अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; मुलीच्‍या वडिलांनी धाडस करत पाठलाग करून संशयिताला पकडले

by Team Satara Today | published on : 03 June 2026


वाई : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून खेळ करणाऱ्या समाजाच्या एका १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना वाई येथील प्रसिद्ध गणपती घाट परिसरामध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीला रंगेहाथ पकडण्यात यश आले आहे. राहुल वसंत पवार (वय २२, रा. सिद्धनाथवाडी, वाई) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.

तक्रारदार हे मूळचे रापली वडगाव, ता. चांदवड (जि. नाशिक) येथील रहिवासी आहे. खेळाच्या निमित्ताने हे कुटुंब १ जून रोजी वाई शहरात आले होते. दि. १ रोजी संशयित राहुल पवार याने पीडितेचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरडा केला. यामुळे तिचे पालक जागे झाले. मुलीच्‍या वडिलांनी धाडस करत संशयिताचा पाठलाग करून त्‍याला पकडले.

मध्‍यरात्री झालेल्‍या या गोंधळामुळे घटनास्‍थळी नागरिक जमा झाले. यानंतर पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. यानंतर संशयितावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आगाशिवनगर येथील देवकर कॉलनी परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांना चिरडण्याचा प्रयत्न; कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
राजकारणात मने दुखावतात, पण शंभूराज माझे चांगले मित्र - ना. जयकुमार गोरे, महायुतीचा उमेदवार एकतर्फी विजयी होईल

संबंधित बातम्या