सातारा : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विख्यात जलदगती गोलंदाज कपिलदेव निखंज यांची विमान प्रवासादरम्यान खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीत 1983 च्या वर्ल्ड कपसह क्रिकेटविषयी चर्चा रंगल्या.
खा. उदयनराजे भोसले हे श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांच्यासह दिल्लीला गेले असताना त्यांची भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव निखंज यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये क्रिकेटविषयक चर्चा रंगली. चर्चेत 1983 साली झिम्बाब्वेविरुद्ध कपिलदेव यांनी खेळलेल्या अविस्मरणीय नाबाद 175 धावांची खेळी आठवून विशेष उल्लेख केला. तसेच, मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी सातारा आणि महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
यासंदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित झाल्यास मी नक्कीच योगदान देईन, असे आश्वासन कपिलदेव यांनी खा. उदयनराजे भोसले यांना दिले. या चर्चेत श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले याही सहभागी झाल्या होत्या.