महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात गॅलेक्सी समूहचा एक महत्त्वाचा टप्पा; गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पजच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 22 January 2026


फलटण : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात गॅलेक्सी समूहाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून  केंद्र शासनाकडून संस्थेला मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्थेची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्थेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे संस्थापक चेअरमन व के. बी. उद्योग समूहाचे युवा उद्योजक संचालक सचिन यादव, संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग, के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे अधिकारी- कर्मचारी तसेच सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना दि. २४ डिसेंबर २०१८ रोजी झाली. सुरुवातीस तालुका कार्यक्षेत्र असलेली ही संस्था आज सातारा व पुणे जिल्ह्यांत विस्तारुन सात शाखांद्वारे यशस्वीपणे कार्यरत आहे. केंद्र शासनाकडून संस्थेला मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्थेची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या पहिल्या शाखेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

संस्थापक चेअरमन सचिन यादव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली संस्थेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेने १२० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून १० हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. सलग चार वर्षांपासून संस्थेस ‘'अ’ वर्ग ऑडिट मानांकन प्राप्त झाले असून पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारामुळे सभासदांचा विश्वास दृढ झाला आहे. संस्थेमार्फत विविध आकर्षक बचत योजना राबवून सर्वसामान्य सभासदांना सहकार प्रवाहात सहभागी करून घेतले जात असून, अडचणीच्या काळात आर्थिक सहाय्य देत सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

कर्नाटक राज्यात शाखा सुरू करणार 

कर्नाटक राज्यात गॅलेक्सी मल्टीस्टेटच्या शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा श्री. यादव यांनी केली. के. बी. एक्सपोर्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या करार शेतीचा लाभ शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मिळावा, या उद्देशाने चालू आर्थिक वर्षात तेथे शाखा सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगारनिर्मिती हा के. बी. व गॅलेक्सी ग्रुपचा प्रमुख उद्देश असून आतापर्यंत सुमारे दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत पाच हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण हादरले ! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून; लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट
पुढील बातमी
सातारा तालुक्यातील साबळेवाडी फाट्यावर कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या