सातारा : सातारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा जिल्हावासीयांसाठी अभूतपूर्व पर्वणी ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असे हे संमेलन ठरेल. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या संमेलनाला भेट द्यावी, असे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक मावळा फौंडेशनचे सदस्य तुषार महामुलकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे शेरेवाडी, ता. सातारा येथील श्री चंद्रकांत बाबूराव जाधव विद्यालय येथे नुकताच गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा झाला. या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मापरवाडी गावचे सरपंच वामन चव्हाण होते. यावेळी सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धामध्ये सातारा तालुक्यात प्रथम क्रमांक आलेली विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अक्षता विठ्ठल चव्हाण (इयत्ता दहावी) हिचा सत्कार करण्यात आला.
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर यश मिळविले आहे. कु. वेदिका विजय निमज (इयत्ता पाचवी) हिने अनुलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक, कु. वेदश्री अमोल बाबर (इयत्ता सहावी) हिने श्रुतलेखनमध्ये तृतीय क्रमांक, कु. प्रगती संतोष यादव (इयत्ता सातवी) हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, कु. अक्षता विठ्ठल चव्हाण (इयत्ता दहावी) हिने शुद्धलेखन स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळविला. त्यांचाही सत्कार करण्यात आला.
विद्यायलायचे मुख्याध्यापक नित्यानंद येरकळ, सुभाष वंजारी यांच्या कडून अक्षता चव्हाण हिला बक्षीस देण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य सुरेंद्र देशपांडे, शेरेवाडीचे माजी शिक्षक रवींद्र स्वामी, मापरवाडी गावचे माजी सरपंच अनिल चव्हाण, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, पंचक्रोशीतील पदाधिकारी, मान्यवर पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका ए. जी. आवडे यांनी प्रास्ताविक यांनी केले. शिक्षिका एस. एस. कुंभार यांनी आभार मानले.