10:37pm | Sep 30, 2024 |
सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी संशयितांकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित सर्वजण सातारा शहर व सातारा तालुक्यातील आहेत.
अर्थव अरुण माने (वय १९, रा. पाटखळ माथा), शारुख नौशाद खान (वय ३०, रा. सोमवार पेठ, सातारा), अकिब जावेद कासिमसाहब नांदगळकर (वय. ३० रा. निसर्ग कॉलनी, बुधवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दी्त २४ सप्टेबर, १२ ऑगस्ट व ३१ जुलै रोजी जबरी चोरीचे गुन्हे घडले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यामुळे शाहूपुरी पोलिस संशयित चोरट्यांचा शोध घेत होते. दि. २९ सप्टेबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेचे पोलीस वाढे फाटा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जावून माहिती घेत होते. त्यावेळी संबंधित गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की संशयित वाढे फाटा येथील परिसरात फिरत आहेत. शाहूपुरी पोलिसांनी पथक तयार करुन तात्काळ वाढे फाटा गाठले. त्यावेळी दोघेजण पोलिसांना मिळाले. पोलिसांनी दोघांकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
याच पध्द्तीने पोलिस हे पारंगे चौक येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जावून माहिती घेत होते. त्यावेळी तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. पारंगे चौकातील जबरी चोरीतील संशयित बुधवार नाका, सातारा येथे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या संशयितांनीही जबरी चोरीची कबुली दिली.
दरम्यान, तिसर्या गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल फोनचा आय.एम.ई. आय नंबर वरुन व तांत्रिक माहितीच्या आधारे दोन विधी संघर्ष बालक निष्पन्न करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी झालेला मोबाईल फोन व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ५३५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अशा प्रकारे या तिन्ही गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले ७५५०० रुपये किंमतीचे ३ मोबाईल व १२०००० रुपये किमतीची गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकल असा एकुण १९५५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोनि राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कुमार ढेरे, आय्याज बागवान, पोलिस सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, निलेश काटकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |