सातारा : आईच्या आजारपणाचे कारण सांगून मित्राकडून
उसने घेतल्यानंतर ते पैसे परत न करता उलट जबरदस्तीने सोन्याची चैन घेवून फसवणूक
केल्याप्रकरणी मित्रासह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील संशयित
मित्राला पोलिसांनी अटक केली असून एकूण 6 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले
आहे.मयुरेश हणमंत कणसे, हणमंतराव माधवराव कणसे, धनुजा पवार (तिघेही रा. शाहूनगर, सातारा.
मूळ रा. पिंपरी, ता.कोरेगााव), दिप्ती भोसले (रा.मुंबई) यांच्या विरुध्द संकेत दाजी गोरड (वय 29, रा.सातारा)
यांनी तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही
घटना नोव्हेबर 2022 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली आहे. तक्रारदार संकेत व मयुरेश हे
दोघे मित्र आहेत. मयुरेश याच्या आईची तब्येत ठीक नसल्याने त्याने संकेतकडून
वेळोवेळी ऑनलाईन, रोख असे एकूण 6 लाख रुपये घेतले. याचदरम्यान मयुरेश याला पैशांची अधिक गरज असल्याने त्याने
पुन्हा तक्रारदार संकेत यांच्याकडे पैसे मागितले. मात्र संकेत यांनी पहिले दिलेले
पैसे देण्यास सांगून आता पैसे नसल्याचे सांगितले. यावर मयुरेश याने उसने घेतलेले
पैसे नंतर देतो, असे सांगितले. तसेच आत्ता पैसे नसतील तर गळ्यातील सोन्याची चैन दे, असे म्हणत
मयुरेश याने इतरांच्या मदतीने संकेत यांची गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली.
मित्र व त्याचे कुटुंबिय असल्याने तसेच पहिले पैसे अडकल्याने तक्रारदार संकेत याने
ही बाब कोणाला सांगितली नाही.उसने घेतलेले पैसे व सोन्याची चैन मिळावी, यासाठी
तक्रारदार संकेत यांनी मित्राकडे तगादा लावला. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ
केल्याने व फसवणूक झाल्याने तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित मयुरेश कणसे याला अटक केली. अधिक
तपास महिला पोलीस हवा. पोतेकर करीत आहेत.
6 लाख 85 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांवर गुन्हा; एकास अटक
by Team Satara Today | published on : 05 March 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा