बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 27 June 2025


सातारा : अवैधरित्या दारु विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी लहू बाबूराव भोई (वय 61, रा. तासगाव ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याकडून 805 रुपये किंमतीच्या 23 दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तासगाव येथे दि. 26 जून रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेचे १९ शेतकऱ्यांना शेती पुरस्कार जाहीर

संबंधित बातम्या