सातारा : येथील एमआयडीसीतील मंदार ट्रेडर्स या दुकानामधील कपाटात ठेवलेली तीन लाख 45 हजार रुपयांची रोकड चोरट्याने सोमवारी (दि. 8) रात्री 10.15 च्या सुमारास चोरून नेल्याची फिर्याद प्रशांत विठ्ठल पवार(वय 39, रा. अजिंक्यतारा कॉलनी, संभाजीनगर, ता. सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारले जी डिस्ट्रिब्युटर मंदार जयंत मुरुडकर यांचे एमआयडीसीत ऑफिस आहे. या ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप, तोडून चोरट्याने कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेली. याची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहे.