नवी दिल्ली : सध्या जगात दोन ठिकाणी युद्ध सुरु आहे. मध्य पूर्वेच आखात आणि युक्रेन-रशिया वॉर. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र, अजूनही या युद्धाचा शेवट दृष्टीपथात नाहीय. सुरुवातीला 10-12 दिवसात रशिया युक्रेनवर विजय मिळवेल असं म्हटलं जात होतं. पण अमेरिका आणि नाटो देशांकडून मिळालेल्या मदतीमुळे युक्रेन अजूनही रशियाला टक्कर देत आहे. उलट युक्रेनने आता रशियाचा काही भाग व्यापला आहे. दुसरं युद्ध मध्य पूर्वेत सुरु आहे, इस्रायल-हमासमध्ये. त्याशिवाय इराण, लेबनान या देशांकडून सुद्धा अधंन-मधन हल्ले सुरु असतात. या युद्धामध्ये सर्वात घातक अस्त्र कुठल ठरतय तर ते म्हणजे मिसाइल आणि ड्रोन्स. रशिया-युक्रेन युद्धात भविष्यात ड्रोन किती शक्तीशाली ठरणार? ते स्पष्ट झालय. शत्रूच्या सैनिकांवर, दारुगोळा भांडारावर हल्ला करण्यासाठी या ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे.
जगाच्या पाठिवर दोन ठिकाणी सुरु असलेलं हे युद्ध पाहून भारताने सुद्धा एक घातक अस्त्र तयार केलय. त्याचं नाव आहे ‘कामिकाजे ड्रोन’. भारताची एलिट संशोधन संस्था नॅशनल एरोस्पेस लॅबरोटरीजने ‘कामिकाजे ड्रोन’ विकसित केलय. स्वदेशी बनावटीच इंजिन या ड्रोनमध्ये असून 1000 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. NAL चे संचालक अभय पाशिलकर यांच्या नेतृत्वाखाली या घातक ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे. हे कमी खर्चिक, मानवरहीत परिणामकारक हवाई वाहन आहे. एका ठराविक उंचीवरुन हे कामिकाजे ड्रोन उड्डाण करतं. स्फोटक वाहून नेणारं हे ड्रोन टार्गेट जवळ काही वेळ भ्रमण करु शकतं. टार्गेटला धडकल्यानंतर मोठा विस्फोट होतो. कमांड सेंटरमधून हे ड्रोन कंट्रोल करता येतं.
हे अस्त्र बनवण्यात इस्रोचा सुद्धा महत्त्वाचा रोल :
30 HP वँकेल इंजिनमुळे हे ड्रोन 100 ते 120 किलो वजन वाहून नेऊ शकतं. यामध्ये 30 ते 40 किलोंची स्फोटक आहेत. NAL ही संस्था CSIR ची घटक आहे. 1959 साली CSIR ची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धापासून कामिकाझे ड्रोनची संकल्पना अस्तित्वात आली. जपानी वैमानिक शत्रूच्या टार्गेटवर थेट आपलं विमान धडकवायचे. यात मानवी जीवाच सुद्धा नुकसान व्हायच. आता कामिकाजे ड्रोनमुळे शत्रुची वित्तहानी, जिवीतहानी होईल पण आपलं मानवी नुकसान होणार नाही. कारण ही मानवरहीत ड्रोन्स आहेत. कामिकाजे ड्रोनच वैशिष्टय म्हणजे GPS चालत नाहीत, अशा ठिकाणी सुद्धा ही ड्रोन्स काम करतात. इस्रोने विकसित केलेली NAVIC सिस्टिम या ड्रोन्समध्ये आहे. त्यामुळे GPS सिग्नल जॅम असलेल्या भागात सुद्धा ही ड्रोन्स आपलं काम अचूकतेने करतात.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |