सदरबझारमधील युवक बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

by Team Satara Today | published on : 11 June 2026


सातारा : सातारा शहरातील सदर बझार परिसरातून 28 वर्षीय युवक अचानक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुल शिवाजी औरासे (रा. सदर बझार, सातारा) हे 2 जून रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडल्यापासून परतलेले नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. याप्रकरणी त्यांचे मावसभाऊ रवींद्र भोयर यांनी तक्रार दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली असून महिला पोलीस हवालदार पाटील पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजिंक्यतार्‍यावर महिलेस शिवीगाळ व मारहाणप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
काशीळमध्ये रात्रीच्या वेळी चेहरा झाकून फिरणार्‍या तरुणावर कारवाई

संबंधित बातम्या