गाझा : इस्रायल-हमास युद्ध दिवसेंदिवस अधिक रक्तरंजित होत चालेले आहे. यामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांना लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य गाझा पट्टीमधील पोस्ट ऑफिसवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी ठार आणि 50 जखमी झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.१३) एन्क्लेव्हमधील मृतांची संख्या 66 झाली असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
इस्त्रायल पॅलेस्टिन संघर्ष मागील १४ महिन्यांपासून सुरु आहे. नुसेरात कॅम्पमधील पोस्ट ऑफिसवर गुरुवारी हवाई हल्ला करण्यात आला. येथे विस्थापित कुटुंबांनी आश्रय घेतला होता. इस्त्रायलच्या हल्ल्यात पोस्ट परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले, असे डॉक्टरांनी 'रॉयटर्स'ला सांगितले. या हल्ल्यात इस्त्रायली हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मध्य गाझा पट्टीमधील पोस्ट ऑफिसमध्ये आश्रय घेणारे 50 जखमी झाले आहे. ज्यामुळे गुरुवारी एन्क्लेव्हमधील मृतांची संख्या 66 वर पोहोचली आहे. इस्रायलच्या लष्कराने दावा केला आहे की, मारलेले गेलेले हमासचे दहशतवादी होते. जहाज अपहरण करण्याचा प्रयत्नावेळी केलेल्या कारवाईत ते मारले गेले आहेत.
हमासने सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये मदत ट्रक सुरक्षित करण्याचे काम करणाऱ्या इस्त्रायली लष्करी हल्ल्यात किमान 700 पोलिस ठार झाले आहेत. इस्रायली सैन्याने गुरुवारी गाझा शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक जिल्ह्यांतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते. ही हल्ल्यापूर्वी पूर्व चेतावणी आहे," असे पोस्ट इस्त्रायलच्या लष्कराने केली होती. गाझा शहरातील अल-जला स्ट्रीटमधील निवासी इमारतीवर आणि नुसीरतच्या पश्चिमेकडील घरावर इस्रायली बॉम्बहल्ल्यात 22 लोक ठार झाले, असे डॉक्टर आणि पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA यांनी सांगितले.
अमेरिकेच्या पाठिंब्याने इजिप्त आणि कतार यांनी अनेक महिन्यांपासून युद्धविरामाच्या प्रयत्न सुरु ठेवला आहे. बुधवार, १२ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने तात्काळ, बिनशर्त आणि कायमस्वरूपी युद्धविराम इस्रायलमध्ये जप्त केलेल्या आणि गाझामध्ये हमासने ताब्यात घेतलेल्या सर्व ओलीसांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी मतदान झाले. दरम्यान, इस्त्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात आतापर्यंत तब्बल ४४ हजार ८०० जण ठार झाले आहेत.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |