मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचेही अभिनंदन करतो. मी म्हणालो होतो.. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आलो नाही तर शेती करायला जाईन. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले...अजितदादा आले त्यामुळे बोनस आहे ..त्यानुसार 237 आमदार आहेत. त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरु झालं आहे. विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं. विरोधी पक्षांच्या अध्यक्ष पदासंदर्भात अधिकार अध्यक्षांचा अभ्यास करुन निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी सभागृहामधील भाषणात एक शायरी देखील बोलले. कर नाही, त्याला नाही डर...उसका नाम राहुल नार्वेकर...असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले. या शायरीनंतर रामदार आठवले आणि माझी आता युती झाली असं मिश्किल विधानही एकनाथ शिंदेंनी केलं.
नाना पटोले याचं मी आभार मानतो की, नार्वेकर यांच्यासाठी त्यांनी अध्यक्षपद रिक्त केलं. खरं आहे ते बोललं पाहिजे. शिवसेना कोणाची यावर अनेक आरोप झाले. आम्ही तिकडे लक्ष दिल नाही. आमच काम करत राहिलो. पहिले आम्ही दोघे होतो. नंतर अजितदादा आले. त्यांनंतर आमचं तीन शिफ्टमध्ये काम सुरु होतं, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकसभेला फेक नेरिटीव्ह केलं त्याचा फटका आम्हाला बसला. आता विरोधकांचा पराभव झाल्यावर ईव्हीएम मशीनवर खापर फोडताय. आता निर्जीव ईव्हीएमवरती आरोप केला जातोय. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन देखील म्हणाले की, हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर बोलता. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण गेले...नाना पटोले वाचले...कोणी 1 लाखाने येतो तर कोणी दोनशे आठ मतांनी आले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाना पटोले यांना टोला लगावला.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |