विविध प्रकारच्या 15 आहुतींचे दान होमकुंडात देऊन दुर्गामाता सहस्त्रचंडी याग

रविवारी महाप्रसादाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 10 October 2025


सातारा  : येथील श्री पंचपाळी हौद  दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या दि. 4ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सातऱ्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात संपन्न झालेल्या दुर्गामाता सहस्त्रचंडी याग सोहळ्याची सांगता होम कुंडामध्ये विविध 15 प्रकारच्या आहुतींचे दान करून पूर्णहुतीने संपन्न झाला. गेले सहा दिवस सुरू असलेल्या या याग सोहळ्यात आज सकाळी दुर्गा सप्तशती पाठ तसेच दुर्गा मंत्रांनी हवन पूर्ण झाल्यानंतर मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, विनायक चिखलगे, श्रीपाद जाधव, श्रीधर कंग्राळकर,  सुनील भोसले, राहुल आहेरराव यांनी  यजमानपद भूषवित विशेष पूजन केले.

 त्यानंतर चंदन, रक्तचंदन, साळीच्या लाह्या, विविध प्रकारची कडधान्य,  तूप, काळे तीळ, फळे, नऊवारी साडी, फुलांचा हार अशी पंधरा विविध प्रकारची आहुतीचे दान दिल्यानंतर साजूक तुपाची  पूर्णाहूतीची धार यजमानांच्या हस्ते विशेषत्वाने बनवलेल्या लाकडी मोठ्या पळीतून होमकुंडात अर्पण करण्यात आली.

दुर्गा माता की जय.. चा जयजयकार करत यावेळी उपस्थित शेकडो देवी भक्तांनी देवी मंत्राचा गजर करून हा यज्ञ सोहळा संपन्न झाला .यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करताना वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी सांगितले की, देवीची शक्ती जी आहे, तिला प्राप्त करून घेण्यासाठी आपण तिला सातत्याने पूजन करताना इच्छित मनोकामना तिला सांगितली पाहिजे. ती सदैव कृपेचा वर्षाव करणारी आहे .त्यातूनच हा असा उपक्रम संपन्न झाला .अशा प्रकारचे अनेक   याग   मंदिर परिसरामध्ये सातत्याने भविष्यकाळात आयोजित केले जातील. व त्याला सर्वांना आपण सर्वजण उपस्थित राहून देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करूया असे सांगितले. यावेळी वेदमूर्ती शास्त्री गोडबोले यांचे सोबत मोहन शास्त्री आपटे, ओंकार शास्त्री ,धनंजय शास्त्री कुलकर्णी, दिलीपशास्त्री आफळे,सोहम कुलकर्णी, ओंकार देशपांडे  यांचे सह मान्यवर  65 वेदमूर्ती व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत  हा सोहळा  पार पडला .त्यानंतर बलिदान आणि महाआरती होऊन  अंगारा तसेच दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान या  सहस्त्र चंडीयाग  सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी मंदिरास भेट देऊन देवीचे कृपाशीर्वाद तसेच मंदिराच्या वतीने सत्कार स्वीकारला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार   शंभूराज  देसाई यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी देसाई यांनीही मंदिरास भेट देऊन देवीचे तसेच याग सोहळ्याचे दर्शन घेतले.

 रविवार दि.12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि.14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महा शिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे, सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे, उपाध्यक्ष शिवाजी भोसले .कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत  आहेत.

सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी , प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण
पुढील बातमी
कराड तालुक्यातील सह्याद्री पतसंस्थेच्या मनमानीविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने; जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

संबंधित बातम्या