सातारा : अज्ञात दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका, सातारा येथे पायी चालत असताना अनोळखी दुचाकीने धडक दिल्याने शुभम राजेंद्र चव्हाण (वय 28, रा. गुरसाळे ता.माळशिरस, सोलापूर) हा युवक जखमी झाला. ही घटना दि. 16 जून रोजी घडली आहे. शुभम सातार्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार थांबला नसून अपघातात शुभम याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.