सातारा : अल्पवयीन मुलीस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी अथर्व देवकर (रा. सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील करीत आहेत.