सातारा : वन, वन्यजीव व सामाजिक वनीकरण व यशवंत शिक्षण संस्था सुरुर यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव 2024-2025 अंतर्गत एक पेड मॉं के नाम वृक्ष लावगड कार्यक्रमाचे चंदनवंदन ता. वाई येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम, मुख्य वनसंरक्षक उत्तम सावंत, उप वनसरंक्षक (वन्यजीव) उत्तम सावंत सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे, सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक खांडेकर यांनी एक पेड माँ के नाम वृक्ष लागवड कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. तर मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांनी वृक्षसंवर्धन व जलसंवर्धन संदर्भात सविस्तर माहिती दिली.
वृक्षारोपन, सीडबॉल फेकणे व बियाणांचे टोकण इत्यादी कार्यक्रम साजरे करण्यात आले.