भारताबाहेर राहत असलेल्या मराठी माणसांसाठी फोरम स्थापनेची मागणी

by Team Satara Today | published on : 24 January 2025


सातारा : माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार यांनी नुकतीच सातारा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी त्यांनी सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयातील वाघ नखांचेही दर्शन घेतले. सध्या संपूर्ण मराठी माणसांच्या परदेशस्थ नागरिकत्वामध्ये पाच लाखाहून अधिक जास्त मराठी माणसे ही भारताबाहेर राहत आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता आणि महाराष्ट्र संस्कृती बाहेरच्या तरुण पिढी पर्यंत योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी एक प्लॅटफॉर्म फोरम कम्युनिटी अर्थात नॉन रेसिडेंट मराठी फोरम ची गरज असल्याचे निवेदन यावेळी सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅनडा येथील रहिवासी सुनील मंत्री यांनी दिले.

यावेळी त्यांचे सोबत सातारा येथील सुप्रसिद्ध फिजिशियन आणि सर्जन, भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉ. अभिराम  पेंढारकर आणि सचिन साळुंखे उपस्थित होते. लवकरच या विषयावर ना.शेलार यांचे सोबत भेट घेऊन याविषयी सविस्तर माहिती देऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ.अभिराम पेंढारकर यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी
पुढील बातमी
दरडप्रवण पुनर्वसन धोरणात आणखी सुधारणा : मंत्री मकरंद पाटील

संबंधित बातम्या