चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा अत्याचार

by Team Satara Today | published on : 20 May 2025


सातारा : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सातारा शहराजवळील एका उपनगरात घडली आहे. चुलत भावाने सातवीत शिकणाऱ्या लहान बहिणीवर वारंवार अत्याचार केला असून, त्यातून बहीण गरोदर राहिली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने २५ वर्षीय भावाला अटक केली.

पीडित मुलगी १३ वर्षाची असनू, तिने सातवीतून नुकताच आठवी इयत्तेत प्रवेश घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून तिचा चुलत भाऊ तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. 

हा प्रकार सांगितलास तर भाऊ, आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. 

तिच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे समोर आले. घरातल्यांनी तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने चुलत भावाने अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर हा सगळा प्रकार पोलिसांकडे गेला. 

पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल करून संबंधित २५ वर्षीय भावाला अटक केली आहे.

पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे. तिला तातडीने गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस व नातेवाइकांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी दिली असून, ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ओगलेवाडी ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पुढील बातमी
इंदोली-पाल उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणास सुरुवात

संबंधित बातम्या