सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या संमेलन गीत लोकार्पण सोहळा सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या कार्यालयात होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
पत्रकात, साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा जसा दिवसेंदिवस येईल तसतसे सातारकरांची उत्सुकता वाढू लागली आहे. नुकताच मंडप उभारणीस प्रारंभ झाला असून संमेलनाची तयारी जोरदार सुरु आहे. संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमही जाहीर झाली असून साहित्य उपक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सातारकर आणि साहित्यिक रसिकांना मिळणार आहे. संमेलनानिमित्त संमेलनगीत तयार करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा साताऱ्याचे नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते आणि लेखक, गीतकार राजीव मुळ्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा सोहळा जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय येथील संमेलनाच्या कार्यालयात होणार आहे. या सोहळ्यास साहित्यप्रेमींनी, सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, स्वागत समितीचे सदस्य, कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे.
.......