सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञाताने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरातील प्रतापसिंह नगर मधील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावजी करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा