सातारा डेमोक्रॅटिकचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

साहित्य संमेलन परिसरास साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंच्या नावाची मागणी

सातारा : देशाची राजधानी दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड व पदाधिकार्‍यांनी दिले.

आपल्या साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेला जगविख्यात गौरव मिळवून देणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये आपल्या शायरीच्या माध्यमातून अमूल्य योगदान देणारे, मराठी भाषेला तीस हजार नवे शब्द देणारे, त्यांचे साहित्य देश विदेशातील विविध भाषेत प्रसिद्ध झाले असून त्यांच्या साहित्यातून उमटलेले प्रतिबिंब जगाला हेवा वाटेल असे आहे. म्हणूनच दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी सरिताताई आवळे, अभिजीत ननावरे, लक्ष्मण पोळ, मंगेश आवळे, अवि तुपे, ऋषिकेश वायदंडे, निलेश घोलप, सुनील भिसे, अभिजीत सकटे, रियाज बागवान व पदाधिकारी उपस्थित होते.


मागील बातमी
जिल्हा रुग्णालयातील गैरसुविधांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
पुढील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या