सातारा : पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुकंदर कमरुद्दिन मुलाणी आणि सिकंदर मुकंदर मुलाणी (दोन्ही रा. सासपडे, ता. सातारा) यांनी तक्रारदारांच्या घरात बेकायदेशीरपणे येऊन गैरसमजूतीतून तक्रारदार तसेच त्यांच्या पतींना मारहाण, दमदाटी करून शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.