वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती

by Team Satara Today | published on : 09 October 2024


सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या अनुषंगाने सातारा येथे सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती संपन्न झाल्या. या मुलाखतीसाठी सातारा जिल्ह्यातून 58 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. याचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीला दिला जाणार आहे.

यामध्ये सातारा-जावळी 13, वाई 7, कराड उत्तर 9, कराड दक्षिण 6, पाटण 5, फलटण 12, कोरेगाव 6 उमेदवारांनी अर्ज केले होते. या मुलाखती सातारा जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडल्या.

या मुलाखतीसाठी ओबीसी, मुस्लिम आदी समूहातून उमेदवार उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तगड्या उमेदवारांनी मुलाखती दिल्यामुळे सातारा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळेल व उमेदवारांची यादी पक्षाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी दिली. मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट, कॉंग्रेस, शिवसेना उबाठा गट या पक्षातूनही इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी ओबीसी मुस्लिम भटके विमुक्त आदिवासी या समूहासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर्ग प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे आणि या सर्वांची संख्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्यात दैदिप्यमान यश संपादन करेल, असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला.

यावेळी वंचित आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, पूर्व जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉंग्रेस पदाधिकार्‍याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे
पुढील बातमी
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन

संबंधित बातम्या