सातारा : सेंट्रींगच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुबेर गणेश मंदीर परिसरात मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने 17500 रुपये किंमतीचे सेंट्रींगचे साहित्य चोरुन नेले. ही घटना दि. 10 एप्रिल रोजी घडली आहे. याप्रकरणी किरण शरद काटकर (वय 39, रा. त्रिपुटी ता.कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी डिवॉल्टर कटर, कटर मशीन, ड्रील मशीन या साहित्याचा समावेश आहे.