सातारा : झेडपीच्या ठराव समिती सभेत जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्याबाबत करण्यात येणार्या कामांवर चर्चा करण्यात येऊन मंजुरी देण्यात आली. तसेच शाळांच्या नवीन खोली बांधकामाबाबतही चर्चा करण्यात आली. ही सभा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतचे प्रभारी सतीश बुध्दे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रज्ञा माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी मोहसीन मोदी, अमर नलवडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी उपस्थित होते. ठराव समितीत प्रथम मागील 24 सप्टेंबरच्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याबाबत विचार करण्यात आला. तसेच मागील ठरावावरील कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर बांधकाम विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये बामणोली, उंब्रज, हेळगाव, वडगाव हवेली, कुडाळ आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी प्रसुतीगृह विस्तारीकरण, मुख्य इमारत दुरुस्ती, आवश्यकतेनुसार विद्युतीकरण, रंगकाम, फरशी आदी कामांसाठी प्राप्त दरानुसार निविदा स्वीकारण्याबाबत मान्यता देण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 207 हातपंपांची दुरुस्ती करण्याच्या दरासही मान्यता देण्यात आली.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |