शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचेही उद्घाटन शिंदे यांनी केले. या प्रसंगी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. या शाळांमधील विद्यार्थी उच्च पदावर काम करित आहेत. माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जी. अब्दुल कलाम, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानींही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे.शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना मोफत उच्च शिक्षण यांसह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा, असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांना शिक्षकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवादकोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. तसेच मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हावे असे आवाहन केले. आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे त्यांनी सांगितले.माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे, परंतु शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कारही घडवावेत, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थी आज उच्च पदावर काम करीत आहेत. शिक्षकांनी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत शाळांना भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिक्षकांनी शिक्षणाची पायाभरणी भक्कम करावी. म्हणजे शैक्षणिक इमारत भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सातारा जिल्हा परिषद विविध शाळंमध्ये विविध उपक्रम राबविण्यात राज्यात अग्रेसर आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असून यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. नागराजन यांनी सांगितले.या कार्यक्रमास शिक्षक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करून राज्याचा लौकिक वाढवावा
कोडोली येथे केंद्र शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
by Team Satara Today | published on : 16 June 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
ड्राय डे नावाला, पार्सल मिळतंय भावाला
December 02, 2025
सातारा जिल्हा न्यायालयासमोर रुग्णवाहिका आणि एसटी बसची समोरासमोर धडक
December 01, 2025
जिल्ह्यात हुडहुडी.....; सातारा गारठला, रविवारी रात्रीपासून थंडीचा जोर
December 01, 2025
हाच खरा मर्दांचा खेळ, निवडणुका तर तृतीयपंथीही लढवतात
December 01, 2025
राजापुरी येथे ६० हजार रुपये किंमतीच्या केबलची चोरी
November 30, 2025
नेले-किडगावमध्ये जुन्या भांडणावरून एकाला मारहाण
November 30, 2025
सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पोलिसांना सापडली कारमध्ये तलवार
November 30, 2025
सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील दत्तनगर कॅनॉलजवळ कारची फळ स्टॉलला धडक
November 30, 2025