पुसेगाव : पुसेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील 14 वर्षे वयाच्या मुलीवर तिच्याच चुलत भावाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संशयितावर पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुपारी घडली. संशयिताने आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने, तिने स्वतः तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयितावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण तपास करत आहेत.