सातारा : विसावा नाका येथील रिलायन्स मॉल समोर सार्वजनिक रस्त्यावर दिनांक ४ रोजी राजेश बाबुराव शिंदे (रा. देगाव चंदननगर कोडोली) स्वप्नील संजू जाधव (रा.मारुती मंदिर शेजारी गोडोली), मयूर जाधव (रा. कोडोली),अमीर सलीम शेख (रा. वनवासवाडी) संग्राम जाधव, रोहन भोईटे यांच्यासह तीन ते ४ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांच्या गचुंड्या पकडत लाथा, बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करत पोलिसांसमोर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुहास कदम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार झेंडे करत आहेत.
विसावा नाका येथील रिलायन्स मॉलसमोर मारामारीप्रकरणी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 05 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा