एमपीएससी आंदोलनाला मोठे यश, मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची मोठी घोषणा, प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती

by Team Satara Today | published on : 11 October 2026


पुणे : एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आता या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिव पदी आयएएस ऑफीसर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे. एमपीएससी पेपर फुटी  चौकशी आयोगाचे  सचिव म्हणून तुकाराम मुंढे, माजी आयएएस लक्ष्मी गौतम पोलिस अधिकारी, सेवा निवृत्त अधिकारी धनेश पाटील, माजी न्यायाधीश पी.डी. नाईक आणि आयोगाचे अध्यक्ष म्हणून  दिलीपजी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. आमदार रोहित पवार हे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.  या दोन नेत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारचा मुसदा घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विद्यार्थ्यांची महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे विवेक भीमनवार यांचा राजीनामा, त्याबद्दल काय निर्णय घेतला जाणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहुल गांधींची मोठी घोषणा; मतचोरी, एसआयआरविरोधात विरोधकांचा उद्या सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा, सरन्यायाधीशांना निवेदन देणार

संबंधित बातम्या