दुबई : दुबई कठोर कायदा पालनासाठी ओळखला जातो. तसेच सर्वात सुरक्षित देश म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे दुबईतून कठोर कायदे नेहमीच बातम्यात असतात. अलिकडे एक असे प्रकरण उघडकीस आले आहे त्यात साध्या पार्किंगच्या भांडणातून दोन पर्यटकांना दुबईतील कठोर कायद्याचा सामना करावा लागला आहे. यात एकाला दुबई सोडून जावे लागले आहे.
दुबईतील एका टेलकॉम परिसरात वाहन पार्किंग करण्यावरुन झालेली शाब्दीक बाचाबाची मारहाणीत रुपांतरीत झाली. हे प्रकरण अखेर कोर्टात गेले.कोर्टाने या प्रकरणात पाकिस्तानी बुजुर्गाला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना देशातून बाहेर जाण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. गल्फ न्यूजच्या मते ही घटना गेल्या वर्षीच्या ८ फेब्रुवारीची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ७० वर्षांच्या पाकिस्तानी इसमाने पार्किंगची जागेवर दावा केला होता. ज्यास ३४ वर्षीय भारतीय नागरिक वापरु इच्छीत होता. त्यावरुन दोघांत बाचाबाची झाली. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या ७० वर्षांच्या बुजुर्गाने भारतीय व्यक्तीला जोराने धक्का मारला. त्यामुळे भारतीय व्यक्तीचा तोल जाऊन तो जमिनीवर पडाला. मेडीकल अहवालानुसार भारतीय व्यक्तीच्या डाव्या पायाच्या हाडात फॅक्चर झाले. त्यामुळे त्याच्या नसांना देखील धक्का बसून स्नायूंना सूज आली. त्यामुळे या जखमेने त्याच्या पायांची ५० टक्के कार्यक्षमता नष्ट झाली. त्यामुळे त्याला कायमस्वरुपाचे अपंगत्व आले.
त्या घटनेनंतर भारतीय इसमाने देखील पाकिस्तानी इसमावर हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानी व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली आहे. याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानी व्यक्ती २० दिवस दैनंदिन काम करु शकला नाही.
या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या दोघांना ताब्यात घेतले. कोर्टात दोन्ही पक्षाचा मेडिकल रिपोर्ट, फोरेन्सिक पुरावे आणि साक्षीदारांची जबानी झाली. त्यानंतर पाकिस्तानी इसमाने धक्का मारल्याची कबूली दिली. परंतू त्याने असा हल्ला करण्यासाठी मला उकसवल्याचा आरोप भारतीय तरुणावर केला.
दुबईच्या क्रिमिनल कोर्टाने या ७० वर्षीय पाकिस्तानी बुजुर्गाला शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्याखाली दोषी सिद्ध करीत तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच शिक्षा भोगल्यानंतर दुबईतून निघून जाण्याचे देखील आदेश दिले.तसेच भारतीय तरुणाचे प्रकरण अन्य कोर्टात पाठवून त्याच्या विरोधात कमी गंभीर आरोपांवर खटला चालणार आहे. गल्फ न्यूजच्या मते ही घटना गेल्या वर्षीच्या ८ फेब्रुवारीची आहे.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |