सुरूर ते पोलादपूर राज्य मार्गाचे काम होत संथगतीने असल्याने सहयाद्रीनगर येथे रास्ता रोको आंदोलन

प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 11 March 2026


सातारा  : सुरूर ते पोलादपूर राज्य मार्गाच्या कामातील  निकृष्ट दर्जाच्या व कूर्मगती कामाविरोधात नागरिक व व्यावसायिकांनी आक्रमकपणे  रास्ता रोको आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली. सहयाद्रीनगर चा संपूर्ण रस्ता यावेळी अडवण्यात आला.

सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून अत्यंत संथगतीने होत असल्याने परिसरातील गावांतील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या आंदोलनात सुरूर, केंजळ, शेंदूरजणे, शहाबाग, यशवंतनगर तसेच वाई तालुका व शहरातील मोठ्या संख्येने नागरिक व व्यावसायिक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात रोजगार संधी मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा; मुख्यमंत्री युवा कार्य' योजनेचाही मोठा टप्पा
पुढील बातमी
कारंडवाडी येथून विवाहित महिला सात वर्षाच्या मुलासह बेपत्ता

संबंधित बातम्या